
कोरेगाव येथे १९३५ सालापर्यंत इंग्रजी शिकण्याची काहीही सोय नव्हती. १९३६ साली श्री.गोपाळ केशव बोकील, बी.ए., यांनी 'सरस्वती इंग्लिश स्कूल' ह्या नावाची एक शाळा सुरू केली. श्री. मारुती केशव कुलकर्णी, ललगूनकर हे सेक्रेटरी होते. श्री.नारायण केशव बोकील, बी.ए., बी.टी.,(सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी), श्री.केशव हरी कुलकर्णी, बोरगावकर आणि श्री.डी.जी. कुलकर्णी, चिमणगावकर हे सहाय्यक शिक्षक होते. एका वर्षात तीन इयत्तांचा इंग्लिशचा वर्ग आणि दुसर्या वर्षी ४थी इंग्रजीचा (हल्लीची ८ वी) वर्ग चालू झाला. तोच क्लास श्री.नानिवडेकर गुरुजी, एकसळचे श्री.दादासाहेब साखवळकर गुरुजी, श्री.बेडेकर वकील आणि श्री.अ.चि.नातू हे चालवित असत.
२ जून १९४१ रोजी याच क्लासचे रूपांतर ‘न्यू सरस्वती इंग्लिश स्कूल’ या शाळेमध्ये करण्यात आले. भैरवनाथ मंदिरासमोरच्या कै.भाईचंद सखाराम गांधी यांच्या माडीवर शाळा भरू लागली. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, कोरेगाव या संस्थेची स्थापना बारा जणांनी एकत्र येवून केली. कै.ग.रा.उर्फ अप्पासाहेब कुलकर्णी वकील हे पहिले अध्यक्ष आणि श्री.डी.एच.टंकसाळे वकील हे पहिले सेक्रेटरी झाले. पहिल्या वर्षी विद्यालयात ४८ विद्यार्थी शिकत होते.
| अ. नं. | नाव | कालावधी |
| १ | श्री.जी. आर. कुलकर्णी | १९४१ ते ४३ |
| २ | श्री.आर. एस. भुंजे | १९४३ ते ५० |
| ३ | श्री.व्ही.पी. बोकील | १९४३ ते ५० |
| ४ | श्री.जी.आर. कुलकर्णी | १९६५ ते ६७ |
| ५ | श्री.जी. ए. भंडारे | १९६७ ते ६९ |
| ६ | श्री.शा. देवजी केशवजी | १९६९ ते ७१ |
| ७ | श्री.शां. रा. भंडारी | १९७१ ते ८० |
| ८ | श्री.ज. ग. भुंजे | १९८० ते ८२ |
| ९ | श्री.भा. आ. बर्गे | १९८२ ते ८४ |
| १० | श्री.ज. भा. झांजुर्णे | १९८४ ते ९३ |
| ११ | श्री.न. मो. झंवर | १९९३ पासून |
| अ. नं. | नाव | कालावधी |
| १ | डॉ. श्री. बी. एस. देशपांडे | १९४२ ते ५० |
| २ | श्री. एस. आर. बेडेकर | १९४० ते ५५ |
| ३ | श्री. के. एन. एरंडे | १९५५ ते ६४ |
| ४ | श्री. एस. आर. बेडेकर | १९६४ ते ६५ |
| ५ | श्री. ग. अ. भंडारे | १९६५ ते ६६ |
| ६ | श्री. जी. आर. टंकसाळे | १९६६ ते ७१ |
| ७ | श्री. एस. जी. घारगे | १९७१ ते ७३ |
| ८ | श्री. डी. बी. म्हेत्रस | १९७३ ते ७५ |
| ९ | श्री. एस.जी. घारगे | १९७५ ते ७७ |
| १० | डॉ. श्री. व्ही. डी. भागवत | १९७७ ते ७९ |
| ११ | श्री. ए. सी. नातू | १९७९ ते ८० |
| १२ | श्री. जे. आर. शहा | १९८० ते ८४ |
| १३ | श्री. एस. आर. भंडारे | १९८४ ते ८७ |
| १४ | श्री. एस. व्ही. शेटे | १९८७ ते ९३ |
| १५ | श्री. एम. आर. ओसवाल | १९९३ ते |
१९५२ – ५३ ची बॅच सरस्वती विद्यालयाची एस एस सी ची पहिली बॅच श्री.एस.डी साठे सर हे त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक होते. बॅचला २२ विद्यार्थी होते. नेमलेल्या शिक्षकांची संख्या कमी असल्याने काही विषय कोणी शिकवायचे असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी कै.जी.आर.उर्फ अप्पासाहेब कुलकर्णी, वकील आणि श्री.एच.टी.शहा, वकील हे इंग्रजी व संस्कृत चे तास घेत असत. बॅचचा निकाल १३% लागला असला तरी संस्कृत मध्ये सर्व विद्यार्थी पास होत होते.
शाळेला स्वत:ची इमारत नसल्यामुळे भाड्याने घेतलेल्या इमारतीमध्ये शाळा भरत असे. संस्थाचालक आणि घरमालक यांच्यात मतभेद झाल्यामुळे एक दिवस घरमालकाने रात्री वर्गाची कुलुपे तोडून समान बाहेर भिरकावले. त्यामुळे शाळेला स्वत:ची इमारत हवी याची संस्थेला प्रकर्षाने जाणीव झाली. कै.अप्पासाहेब कुलकर्णी यांनी गावकर्यांना शाळेची गरज पटवून दिली त्यावेळी कै.भिकोबा सखाराम उर्फ भिकुतात्या बर्गे यांनी कोर्टाशेजारची स्वत:च्या मालकीची जमीन दिली. १९५० – ५१ साली शाळेची इमारत बांधण्यास सुरुवात झाली. सरस्वती विद्यालयाची भव्य इमारत सध्या तिथे डौलाने उभी आहे. १९७८ पूर्वी सरस्वती विद्यालय ही एकच शाळा संस्थेची शाखा होती. त्यानंतर एकंबे येथे ‘शारदा विद्यालय’, जांब- त्रिपुटी येथे ‘र.द.ओसवाल विद्यालय’ व कोरेगाव येथे विना अनुदान तत्वावर प्राथमिक विद्यालय अशा तीन शाखा सुरू झाल्या.

